मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने सातपुड्यातील ४०० ऊसतोड कामगारांना साडी ब्लॅंकेट वाटप, नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी – रवींद्र चौधरी यांचे प्रतिपादन.

0 0
Read Time:4 Minute, 36 Second

Loading

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने सातपुड्यातील ४०० ऊसतोड कामगारांना साडी ब्लॅंकेट वाटप. नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी आहेत.:: रवींद्र चौधरी यांचे प्रतिपादन.

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )::मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून, आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे,यांचा तर्फे स्वर्गीय अनंत म्हात्रे, व बंधू चंद्रकांत म्हात्रे यांचा स्मृती पित्यर्थ ,स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेश भाई ठक्कर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,यांचा पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, यांचा सहकार्याने ब्लँकेट साड्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बापूसाहेब दीपक पाटील यांच्या सह नागाई शुगर कंपनीचे रवींद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे कार्यकारी संचालक मॅनेजिंग डायरेक्टर अशोक पाटील शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत चव्हाण साहेब, यांच्या हस्ते साखर कारखान्यातील ऊसतोड कामगार लोणखेडा, सारंखेडा, कुडावद, जावदा, भुते आकसपूर, या ठिकाणी 4 00 कामगारांना बँकेत साडी वाटप करण्यात आले. यावेळी नागाई शुगर कंपनीचे चेअरमन रवींद्र चौधरी यांनी सांगितले की, बऱ्याच लोकांकडे संपत्ती असते सर्वांना देण्याची इच्छा होते असे नाही, परंतु नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र मनीलाल शिंपी हे मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून मुंबईसारख्या मायानगरीत राहूनही आपल्या गोरगरिबांधवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पोस्टमन ची भूमिका घेऊन विविध संस्था, दानशूर उदार व्यक्तिमत्व असलेले दाते यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने एक तपस्वी म्हणून कार्य करीत आहेत याच्या आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा शब्दात अभिनंदन आणि कौतुक केले. दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांनीही बोलताना सांगितले की या ठिकाणी उपस्थित सर्व ऊसतोड कामगार बंधू-भगिनींमध्ये आम्हाला प्रत्यक्ष विठू माऊलीचे दर्शन होत आहे आणि म्हणून ही सेवा करण्याची संधी आम्हाला मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून मनिलाल शिंपी यांच्यामुळे लाभली आहे. परिवर्धा येथील समाजसेवक डॉ. किशोर आमोदकर यांचा हस्ते परिवर्धा परिसरातील , तऱ्हाडी शिवारातील भगवान रामू चौधरी यांच्या शेतातील ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेट व खाऊ वाटप करण्यात आले.तसेच जावदे ,भुते, आकसपुर परिसरातील ऊसतोड कामगार आदिवासी बंधू भगिनींना ब्लँकेट साडी वाटप करण्यात आले.यावेळी सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे सुपरवायझर श्री.संजय रतिलाल शिंपी यांचा प्रमुख उपस्थितीत,छोटू गिरासे,याचे विशेष सहकार्य लाभले. 🙏🏻

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

You may have missed

error: Content is protected !!