महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळीशाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा….



महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी
शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा….
अमळनेर प्रतिनिधी
आज शैक्षणिक सत्र 2024-25 चा पहिला दिवस.. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी ता. अमळनेर जि. जळगाव येथे विद्यालय सुरू होण्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींचे विद्यालयाचे.. पदाधिकारी…
अध्यक्ष..प्रेमराज वामनराव चव्हाण चेअरमन जनार्दन मांगो शेलकर,व्हॉइस चेअरमन.डॉ जीवनलाल भिवसन जाधव
संस्थेचे सचिव हिम्मत श्रावण चव्हाण,
संचालक. सुधाकर रघुनाथ महाजन
विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक सुरेश संतोष चव्हाण.विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास प्रभाकर शेलकर व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थीनींना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वाटप संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पाचवी वर्गात नव्याने दाखल विद्यार्थ्यांनाआकर्षक सजावटीसह बैलगाडीत बसवून गावातून प्रभात फेरीचे सहवाद्य आयोजन करण्यात आले……
या शिवाय शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना मिष्ठान्न
सह मध्यान्ह भोजन वाटप करण्यात आले ..विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून तणावमुक्त अध्ययन पध्दतीने कशा रीतीने विविध कौशल्य शिकण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देता येईल व विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करता येईल, गुणवत्ता वाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी… पदाधिकारी व मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे कशा पद्धतीने कार्य करावे लागेल याविषयी विचार विनिमय करण्यात आला….. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. आर के सोनवणे सर यांनी केले.विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर बंधूंच्या सहकार्याने शाळा प्रवेशोत्सव 2024.मोठ्या उत्साहात पार पडला.