• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अजय भामरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान

Sep 30, 2024

Loading

अजय भामरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान

अमळनेर प्रतिनिधी

शिवचरण फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार शिक्षक ,कवी ,पत्रकार अजय भामरे यांना भारतातील पहिली महिला सर्पमित्र तथा (राष्ट्रपती पुरस्कार नारीशक्ती सन्मान २०२०, भारत सरकार) मा. वनिताताई बोराडे यांच्या हस्ते दि.२९ सप्टेंबर२०२४ रोजी मुक्ताईनगर येथे प्रदान करण्यात आला.
या समारंभाला मा. सौ.रोहिणीताई खडसे-येवलेकर ( चेअरमन मुक्ताईनगर तालुका एज्यु. सोसा.मुक्ताईनगर) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ सुभाष बागल (फाऊंडेशन राज्य सचिव ,छ.सं नगर) शिवचरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर,
तुळसशीराम बोबडे (राज्य सल्लागार )
यासह आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *