
आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : एका व्यक्तीने दुसऱ्या समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात शेअर केल्याने जिल्ह्यासह धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त धरणगाव शहर शिवसेना पक्षातर्फे धरणगाव पोलिस निरीक्षक पवन देसले यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिष पाटील यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये छेडछाड करुन एका समाजाबद्दल चुकीचे लिखाण समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनात माजी आमदार डॉ.सतिष पाटील व कासोदा येथील नवाज सय्यद यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतूने सोशल माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल संबंधितांवर कठोर शासन होणेबाबत शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन यांच्या लेटरहेडवर शिवसेना पक्षातर्फे स्वाक्षऱ्याचे निवेदन पो.नि. देसले यांना देण्यात आले असून समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. धरणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांना शिवसेनेचे विनय भावे, शहरप्रमुख विलास महाजन यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे अभिजित पाटील, अहमद पठाण, बाळासाहेब जाधव, मच्छिंद्र पाटील, सुदर्शन भागवत, राकेश माळी, हृषिकेश महाजन, प्रशांत देशमुख, भिका मराठे, पवन महाजन, जितेंद्र महाजन, भरत माळी, सुदर्शन भागवत, नरेश कट्यारे, जितेश महाजन, सुमित मराठे, आकाश महाजन, यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.