अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय  अनिल पाटील 32667 मतांनी विजयी
1 min read

अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय अनिल पाटील 32667 मतांनी विजयी

Loading

अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय

अनिल पाटील 32667 मतांनी विजयी

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अमळनेर विधानसभा निवडणुकीकडे लागले होते..
यामध्ये महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदे तर महायुतीचे अनिल पाटील व अपक्ष शिरीष चौधरी अशी त्रिशंकु लढत होती त्यात मंत्री अनिल पाटील यांनी बाजी मारत ३२ हजार ६६७ मतांनी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव केला. तर डॉक्टर अनिल शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर वर राहिले..

डॉक्टर अनिल शिंदे यांना उशिरा मिळाल्यामुळे उमेदवारी त्यांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला नाही.. मंत्री अनिल पाटील यांनी पहिल्यापासूनच प्रचार प्रसार जोरात ठेवला होता त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी होती त्यामुळे योग्य नियोजन व मुसद्दी राजकारणी म्हणून अनिल पाटील यांची ओळख आहे.
एकीकडे डॉक्टर शिंदे यांना जर चांगले मतदान मिळाले असते तर कदाचित शिरीष चौधरी पुढे राहिले असते पण डॉक्टर शिंदे ना पाहिजे त्या प्रमाणावर मतदान मिळू शकले नाही याचा फायदा अनिल पाटील यांना झाला आणि अनिल पाटील पहिल्यापासूनच आघाडीवर राहिले..
तुतारी गटाचे शरदचंद्र पवार यांनी अनिल पाटील यांना पाडण्यासाठी कंबर कसली होती पण ते सपसेल नापास झाले.. अनिल पाटील यांनी आपलं वर्चस्व आपली ताकद पुन्हा दाखवून दिली ..त्यांची काम करण्याची पद्धत विकास कामासाठी त्यांचे प्रयत्न व लोकांचा विश्वास यामध्ये ते यशस्वी झाले..
शिरीष चौधरी यांच्याकडे योग्य नियोजन व कार्यकर्त्यांची संख्या थोडी कमी पडली, तरी पण त्यांनी चांगली मत मिळवली.. जर अनिल शिंदे यांनी चांगला लीड घेतला असता तर ते कदाचित निवडले असते.. असो निवडणुकीत यश अपयश असतेच पण अमळनेर तालुक्यातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती हे तेवढे सत्य आहे..
15- अमळनेर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार
अनिल भाईदास पाटील (महायुती) – 107753 मते मिळाली तर पोस्टलमते अनिल पाटील 1429 मिळाली असे एकूण अनिल पाटील 109182 मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी 75578 व पोस्टल मते 937 मिळाली एकूण 76515 मते मिळाली.

अशी झाली मतमोजणी..
सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी , आधी मोजणार टपाली मतदान झाले होते.
अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले होते. ईव्हीएम साठी १४ टेबल , पोस्टल मतदानासाठी ६ आणि इटीपिबीएस साठी ३ टेबल होते.
प्रत्येक टेबलवर एक अधिकारी एक सहायक व एक शिपाई होता. एकूण २४ फेऱ्या झाल्या. दुपारपर्यंत २पर्यंत अंतिम निकाल आला. मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून १२ अधिकारी आणि ११० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात होते. सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल करून गोंधळ माजवला जातो , फजिती केली जाते. त्यामुळे मोबाईल ला बंदी घालण्यात आली होती. तीन ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. प्रवेशद्वाराजवळच पत्रकार कक्ष ठेवण्यात आला होता.यासाठी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे सह महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस यांनी शांतातापुर्ण मार्गाने मतमोजणी यशस्वीपणे पार पाडली…

*मंत्री अनिल पाटलांची श्री मंगळ ग्रह देवतेवर अपार श्रद्धा*

मंत्री अनिल पाटील यांची श्री मंगळ ग्रह देवतेवर अपार श्रद्धा दिसून आली.
२०१९ च्या अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी अनिल पाटील सकाळपासून येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाच्या सान्निध्यात होते.
यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशीही अनिल पाटील हे सकाळपासून श्री मंगळ ग्रह मंदिरात ध्यानस्थ होते. विजयी घोषित होताच अनिल पाटील यांनी प्रथमतः श्री मंगळग्रह देवतेचा सत्कार केला आणि त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनिल पाटील मतमोजणी केंद्राजवळ मार्गस्थ झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *