*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा*
पारोळा : राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन संदर्भात शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील होत्या. प्रत्येक शाळेत शाळा प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, यांना आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन, प्रथमोपचार व कमीतकमी वेळेत शाळेची इमारत रिकामी करणे यासाठी प्रशिक्षण असणे आवश्यक आहे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख म्हणून श्री. सतीश कांबळे आणि प्रशिक्षक म्हणून श्री. रविंद्र पाटील होते व इतर आपदामित्र म्हणून एकूण बारा सदस्य होते. श्री सतीश कांबळे यांनी त्यांच्या सदस्यांकडून अनेक आपत्कालीन प्रसंगी प्रसंगावधान साधून कोणती काळजी घ्यावी त्यातील प्रात्यक्षिके करून दाखवली. उदा. स्ट्रेचर चे प्रकार, नदी, पाण्यातील आपत्ती प्रकार, उंच शिडी, रोप,उंच इमारतीतील लोकांना खाली उतरवणे आणि आपण तिथपर्यंत पोहचणे, अचानक लागलेली आग इत्यादी. प्रात्यक्षिके करीत असताना अनेक घटनांचा उल्लेख उदाहरणादाखल केला. या कार्यशाळा प्रसंगी प्रा. पी. पी. पाटील, डॉ. ईश्वर एस. पाटील उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. कोळी यांनी केले. तसेच या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. पंकज बाविस्कर, प्रा. किरण पाटील, शिपाई दीपक भिल यांनी मेहनत घेतली. कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड. वसंतराव मोरे, संचालक श्री. रोहन मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेत प्रा. व्ही. एन. पाटील, प्रा. श्रीमती एन. बी. पाटील, प्रा. श्री. एस. एस. सूर्यवंशी, प्रा.श्रीमती सोनल भोई, प्रा. श्रीमती भाग्यश्री घोंगाणे, प्रा. श्रीमती योगिता पाटील यांनी सहभाग नोंदविला.