डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा जळगावी येणार : मुकुंद सपकाळे
जळगाव :- डॉ. बाबासाहेब अस्थिकलश यात्रा रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी ( ७ फेब्रुवारी ) चैत्यभूमी दादर येथून निघणार असून दिनांक १४ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे येणार आहे तेंव्हा जनतेने या यात्रेत मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले आहे .
पद्मालय विश्रामगृह , जळगाव येथे दिनांक १ फेब्रुवारी रोजी या यात्रेच्या नियोजनार्थ आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना सपकाळे यांनी सदर माहिती दिली .
मुकुंद सपकाळे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश यात्रा दिनांक १४ फेब्रुवारी रोजी जळगावी आलीअसता कृष्णा लॉन , शिरसोली रोड येथे तिचे भव्य स्वागत करण्यात येईल त्या नंतर संत गाडगेबाबा चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , आकाशवाणी चौक , राजमालती नगर , सम्यक बुद्ध विहार , तक्षशिला बुद्ध विहार , शास्त्री टॉवर , नेहरू चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन जळगाव येथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे .
प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की, ही यात्रा धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्थे तर्फे आयोजित करण्यात आली आहे . १९५६ मध्ये धुळेकरांनी बाबासाहेबांच्या अस्थी आणून त्या संरक्षित केल्या आहेत , त्याची माहिती जनतेला व्हावी , बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार व्हावा या करिता सदर यात्रा आयोजित करण्यात आली आहे .
कार्यक्रमाच्या नियोजना विषयी माजी नगरसेवक राजू मोरे यांनी मार्गदर्शन करून ही यात्रा अधिकाधिक यशस्वी करण्या करिता सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले.
मुकुंद सपकाळे हे अध्यक्षस्थानी होते , सूत्रसंचालन जगदीश सपकाळे , प्रास्ताविक प्रा. प्रितीलाल पवार तर आभार प्रदर्शन दिलीप सपकाळे यांनी केले .
शिरीष अडकमोल, श्रीकांत बाविस्कर , सोमा भालेराव , रमेश सोनवणे, मनोहर गाढे , दिलीप अहिरे , महेंद्र केदारे यांनी सुध्दा विविध सूचना मांडून यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले.