ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा
दिनांक: 30जानेवारी 2025
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन केले.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक श्री. पराग पाटील, प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण व विशेष अतिथी म्हणून सर्व पालक उपस्थीत होते.
विशेष आकर्षण म्हणून ई.२रीच्या विद्यार्थ्यांच्या फुटबॉल मॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रोमांचकारी सामन्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ दाखवला, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना जोरदार पाठिंबा दिला. फुटबॉल मॅचच्या दरम्यान शालेय वातावरण आनंदाने भरले होते.
पालकांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या मुलांच्या खेळाचा आनंद घेतला आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तसेच पालकांनी देखील त्यांच्या साठी ठरवलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या क्रीडा शिक्षिक केदार देशमुख, सागर चावरिया आणि रमेश धनगर यांनी व्यवस्थापनासाठी मेहनत घेतली, ज्यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास ठरला.
या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासोबतच त्यांच्या सहकार्याची भावना आणि स्पर्धात्मकतेचा अनुभवही वाढला. शाळेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या अकराव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप सर्व विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक मेडल्स प्रदान करून झाला. या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान मिळाले.