व्ही . झेड. पाटील हायस्कूल शिरूड च्या उपशिक्षिका रत्नप्रभा मोरे- बिऱ्हाडे सेवानिवृत्त.
अमळनेर प्रतिनिधी
शिरूड ता. अमळनेर ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी अंतर्गत येथील व्ही झेड पाटील हायस्कूल च्या उपशिक्षिका रत्नप्रभा अशोक बिराडे या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त शाळेने कार्यक्रमा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष जिभाऊ पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती श्याम बापू पाटील होते. मुख्याध्यापक श्री अनिल सूर्यवंशी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी श्री अशोक बिराडे, श्री हृदयनाथ मोरे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी रत्नप्रभामध्ये मॅडम यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांकडून मिताली महाजन आणि खुशी कुंभार या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. शाळेच्या वतीने शिक्षिका रत्नप्रभा मोरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थांना महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका योगिता देशमुख यांनी केले तर आभार उपशिक्षिका सविता अहिरे – बोरसे यांनी मानले.
कार्यक्रमास शिक्षक प्रशांत निकम, संध्या चव्हाण, मंगल सिंग जाधव, वसंत सूर्यवंशी, गुलाब बोरसे, वैशाली भोई, राधिका मॅडम, धिरज अहिरे, अरुण पाटील, भास्कर भाऊ, राहुल लांडगे, सुशांत संधांशिव तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.