• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील यशवंत 6 मार्च ला जाणार इस्रो, आयआयटी भेटीला नोबेल फाउंडेशनची कौतुकास्पद कामगिरी

Feb 28, 2025

Loading

महाराष्ट्रातील 125 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील यशवंत 6 मार्च ला जाणार इस्रो, आयआयटी भेटीला

नोबेल फाउंडेशनची कौतुकास्पद कामगिरी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था, भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव तर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या तब्बल 125 विद्यार्थ्यांना यावर्षी इस्रोची सफर घडणार आहे. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सदर विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थी 6 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत इसरो ,आयआयटी, सायन्स सिटी ,आयआयएम या शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित त्याने या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची ही उत्कृष्ट संकल्पना आहे.
महाराष्ट्रातून एकाच वेळेला 125 विद्यार्थी इस्रो भेटीला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे हे नववे वर्ष आहे. आजपर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून साडेसहाशे हुन अधिक विद्यार्थ्यांनी इस्रो भेटीचा आनंद घेतलेला आहे. याला विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील महाराष्ट्रातील क्रांती म्हणावी लागेल. मागील वर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ऑनलाईन पद्धत आणि प्रत्यक्ष पेपर पद्धतीने संपन्न झाली. तसेच गुणवत्ता यादीतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती संपन्न झाल्या याद्वारे 125 विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी, आयआयएम,सायन्स सिटी अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी गटात अथर्व जयंत दंगाने जळगाव ,पार्थ उमेश विसपुते जळगाव, आराध्य अमित मेहता कोल्हापूर अनुक्रमे राज्यात प्रथम आलेली आहेत. परम अजय कुमार पाटील जळगाव, वेदश्री वाघ नाशिक, ओजस अनिल कुलकर्णी संभाजीनगर अनुक्रमे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झालेत. तर पवन विनोद चव्हाण ,नांदेड. यथार्थ कौस्तुभ जनाईकर नागपूर, प्रसाद भागवत मसणे संभाजीनगर अनुक्रमे इयत्ता आठवी ते दहावी गटात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. तर नरेंद्र राजकुमार रक्ते नांदेड, तस्मय मनोज शिंगाने बडनेरा, यश ज्ञानेश्वर पाटील भुसावळ आठवी ते दहावी गटात अनुक्रमे राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सदर विद्यार्थी 6 मार्च ते 9 मार्च या कालावधीत विक्रम साराभाई स्पेस सेंटर अहमदाबाद आयआयटी गांधीनगर आयआयएम अहमदाबाद सायन्स सिटी अहमदाबाद फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद इत्यादी ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत. अशी माहिती नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून शेकडो विद्यार्थी इस्रो आयआयटीपर्यंत जाणे ही समाजातील मोठी क्रांती नोबेल फाउंडेशनच्या कामामुळे घडत आहे. याच विद्यार्थ्यांमधून भविष्यातील नोबेल पुरस्कार विजेते भारतीय घडतील याची खात्री आहे. अशी भावना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी व्यक्त केली.
इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे इयत्ता पाचवी ते सातवी गट- परम अजयकुमार पाटील जळगाव, आर्या योगेश सोनार जळगाव, क्षितिज रणजीत ठाकरे अमरावती, शिवम किशन पाचलिंग नांदेड ,विबोध गोकुळ पवार नाशिक, आराध्य प्रसाद रानडे अमरावती ,अन्वेश शिवाजी वाघमारे नाशिक, अनया नगरकर पुणे, वेदश्री वाघ नाशिक, श्लोक सचिन लगड संभाजीनगर, पार्थ सचिन इंगोले अमरावती ,मोक्ष समदारिया संभाजीनगर, तन्मय यशवंत गांगुर्डे जळगाव, नील भरत पेंढारकर नंदुरबार, शौर्य अजित सिंग रोंगे पुणे ,अनन्या संजय ठाकरे अमरावती ,हर्षित स्वप्निल बाहेती संभाजीनगर, श्रीरंग सतीश पिहूल जळगाव, अनुप्रिया अभयसिंग नाईक नांदेड ,खुशी आस्वार अमरावती ,प्राप्ती विपुल समदारिया संभाजीनगर ,आराध्य अनिल पिंपळे अमरावती, कुशल विलास अमृतकर जळगाव,सिद्धी देवेंद्र पाटील कोल्हापूर, अर्णव अंबादास बनसोडे अमरावती,देवयानी प्रशांत चक्करवार अमरावती, दियांश लकी झंवर अमरावती, श्याम गणेश गोरे संभाजीनगर,मयुरेश महेश स्वामी संभाजीनगर, समर्थ काविटकर अमरावती, रियान शिंपी जळगाव देवांश पंकज गिरे नागपूर, सम्यक पटणी संभाजीनगर ,आराध्य मेहता कोल्हापूर ,सत्यम गायकवाड नाशिक, आदित्य नांदुरे नांदेड, श्रवण संतोष भाकरे अमरावती, विभोर वाणी जळगाव, भावेश प्रभाकर नळकांडे अमरावती ,अमित घाटे अमरावती ,मृण्मयी पारेकर संभाजीनगर ,निरंजन बराटे जळगाव, हर्षदा वर्पे संभाजीनगर, साई प्रताप तांदळे नांदेड ,कपिल काजळे नांदेड ,कार्तिक काकडे ,नांदेड वेदांत चावरा, नागपूर सम्यक उपलवार ,अमरावती हर्षल निलेश लष्करी अमरावती ,पूर्व कुलकर्णी नांदेड ,अर्णव मोहिते कोल्हापूर ,धैर्य दिनेश गाडेवाल पुणे, सार्थक नंदलाल साबे नागपूर ,अथर्व किरण पाटील जळगाव ,शिवराज बाबर कोल्हापूर ,केतकी सचिन पाटील नाशिक इयत्ता 8 ते 10 वी गट- नरेंद्र रकते नांदेड ,वेद कुऱ्हाडे नांदेड ,जय शेळके पुणे ,सारंग जोशी संभाजीनगर, आमोद मोसालकर संभाजीनगर, स्वरितसिंग पाटील जळगाव ,आदिती पाटील जळगाव ,स्नेहीत बंड अमरावती ,सुजित सोनवणे जळगाव, सचिन पाटील जालना ,आर्य दुशिंग संभाजीनगर, सिद्धी शर्मा बडनेरा, प्राप्ती पोटदुखे अमरावती, सोहम शेळके चाळीसगाव, अनुष्का वामन नाशिक,ज्ञानदा कुलकर्णी जालना, परिमल दुधे अमरावती,श्रेयस चव्हाण बडनेरा ,तृप्तीपोहो नांदेड, स्वरित वानखेडे नाशिक, भूमिका बहाकर अमरावती, तन्मय शिंगाने बडनेरा, सुहास ढोले संभाजीनगर,आर्यन दळवी संभाजीनगर, आर्यन सुरसे नाशिक, सम्यक शिरसाठ संभाजीनगर,स्नेहराज पाटील जळगाव,अथर्व गिरी बडनेरा, भूमि मुथा संभाजीनगर,अमेय अमृतकर नाशिक, प्रसाद कलने नांदेड,गौरी माळी ध्रुव चौधरी दादर, विराज गायकवाड पुणे, निसर्ग निमकर बडनेरा, सुहान गोसावी संभाजीनगर,आर्यन सोनवणे संभाजीनगर, अमित कांबळे संभाजीनगर ,सोनिका जाधव नांदेड, दिशा जयपुरिया बडनेरा, दर्शन बडगुजर जळगाव, प्रसाद म्हसणे संभाजीनगर, यश पाटील भुसावळ, प्रथमेश पगार नाशिक, सुशांत बोराडे नागपूर ,कनिष्ठ साळुंखे नाशिक ,सिद्धेश मुळी संभाजीनगर ,भावेश वाघ जळगाव, विश्वजीत करपे संभाजीनगर ,उत्कर्ष निकुंभ नागपूर, श्रवण नारखेडे जळगाव.आराधना जंगीलवाड जळगाव, योगेश पाटील नाशिक,कृष्ण कापसे नाशिक, जय नेवे जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *