• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न*

Feb 28, 2025

Loading

*प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न*
————————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वनस्पतिशास्त्र पदवीच्या विद्यार्थियांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली.
अभ्यास दौऱ्यात कोकणातील दिवेआगर बीच येथे भेट देऊन विद्यार्थ्यांनी सरग्यासम (Sargassum) आणि पडायना (Padina) यांसारख्या सागरी शैवाळांचे संकलन करण्यात आले. महाबळेश्वर येथे वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास करण्यात आला.
पुण्यातील आगरकर संशोधन संस्थेला (Agarkar Research Institute) भेट देऊन शास्त्रद्य डॉ. मंदार दातार आणि डॉ.रीतेश चौधरी यांनी व त्यांच्या संशोधकांनी प्रतापच्या विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र विषयक मार्गदर्शन केले. याशिवाय, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था (Botanical Survey of India) येथे प्रताप महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागतील माजी विद्यार्थी असलेल्या शास्त्रद्य डॉ. डी. एल. शिरोडकर यांनी वनस्पती ओळख आणि वर्गीकरण शास्त्र (Taxonomy) याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच, या अभ्यास दौऱ्यात प्रतापगड, जंजिरा, महाड येथील चवदार तळे, इच्छापूर्ती गणेश, लेन्याद्री, ओझर गणपती, गोंदेश्वर महादेव मंदिर यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनाही भेट देऊन त्या परिसरातील वनस्पतींचा सुद्धा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली.
या अभ्यास दौऱ्याचे आयोजन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या सौजन्याने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, कुलसाचिव श्री. राकेश निळे, लेखाधिकारी श्री.देवेंद्र कांबळे तसेच संपूर्ण खान्देश शिक्षण मंडळ व्यवस्थापनाचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.
या अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.जयेश साळवे, प्रयोगशाळा सहाय्यक श्री.संदीप बिऱ्हाडे तसेच प्रा.प्रगती पाटील आणि प्रा. हर्षाली चौधरी, कर्मचारी रेहान मुजावर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *