**तात्यासो विलासराव पाटील: ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास**
तात्यासो विलासराव पाटील हे ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांच्या मिश्रणातून घडलेले व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी शिक्षण, आरक्षण आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
### *१. शैक्षणिक व संस्कार*
– **कुटुंबीय परंपरा:** विलासराव पाटील यांचा जन्म आणि संगोपन शैक्षणिक वातावरणात झाला. त्यांची आई मंदाकिनी आई पाटील राष्ट्रसेवा दलाची कार्यकर्त्या होत्या, ज्यांनी त्यांना कडक शिस्तीचे आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचे धडे दिले.
– **स्वभाव:** धैर्यशील, प्रेमळ, संयमी आणि सदैव प्रसन्न व्यक्तिमत्व या गुणांनी त्यांची ओळख होते. विलासराव पाटील यांचे वडील देवगांव देवळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै बापूसाहेब एस एल पाटील यांच्या निधनाने परिवारामध्ये एक पोकळी निर्माण झाली..
### २. ओबीसी समाजासाठी कार्य
– **ओबीसी स्वतंत्र जनगणना:** २०११ मध्ये राष्ट्रीय जनगणना अभियानात ओबीसींची स्वतंत्र गणना होण्यासाठी त्यांनी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सक्रीय जनजागृती केली; पंतप्रधानांना ५००० पेक्षा अधिक पोस्टकार्ड पाठवले.
– **आरक्षण संघर्ष:** नंदुरबार जिल्हा वेगळा झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील एसटी आरक्षण कमी करून ओबीसींना १९% आरक्षण मिळावे, यासाठी त्यांची संघटित मोहीम आणि आंदोलन, जाती निहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी त्यांनी अनेक आंदोलन व मागणी शासनाकडे केली होती..
आताच दोन दिवसापूर्वी मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. त्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले..
– **२७% उच्च शिक्षण आरक्षण:** सर्वोच्च न्यायालयातील याचिका आणि स्थगितीनंतर २००८ मध्ये ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सातत्याने आंदोलन करून ही आरक्षणे कायम राखण्यास मदत.
### ३. सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम
– **अ.भा.माळी महासंघ:** वधू-वर परिचय मेळावे, रक्तगट तपासणी, वृक्षारोपण आणि शिक्षक सन्मान कार्यकमांचे आयोजन.
– **बिंदू नामावली घोटाळा उघडकीस:** धुळे जिल्हा परीक्षेच्या चुकीच्या बिंदू नामावलीमुळे ओबीसी भरतीबंदी उघडकीस आणली, ज्यामुळे दहा वर्षांपासून बंद भरती पुन्हा सुरू.
– **शिक्षक दिन व पुरस्कार:** महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी मागणी; खानदेशातील २०००+ शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान.
### ४. शिक्षणक्षेत्रातील पुढाकार
– **देवगांव देवळी शाळा:** सातवींपर्यंत शिक्षण उपलब्ध असतांना पुढील शिक्षणासाठी अडचण येत होती. विलासराव पाटील यांच्या प्रयत्नांनी दहावीपर्यंत शाळा उभारली, ज्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे प्रगती करीत आहेत.
– **गुणवत्तापूर्ण शिक्षक नियुक्ती:** तळागाळातील समाजातील गुणवंत शिक्षकांना प्राधान्याने नोकरी देऊन शैक्षणिक दर्जा उंचावला.
– **वाचनसंस्कृतीचे संवर्धन:** सावित्रीबाई फुले वाचनालय चालवून स्थानिक वाचन संस्कृती वाढवली.
– अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,
अध्यक्ष- खान्देश वैधानिक विकास फोरम,अध्यक्ष- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय देवळी,
– ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष
– शिक्षक पतपेढी संचालक ते मा. उपसभापती
– उत्कृष्ट वक्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि मार्गदर्शक, महानगरपालिका धुळे येथे शिक्षक ते माजी मुख्याध्यापक असा प्रवास,
**तात्यासौ विलासराव पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा!**
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन(पत्रकार)
उपशिक्षक महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर