सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम
1 min read

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

Loading

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100%
शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

अमळनेर वार्ताहर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च- 2025 घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा माध्यमिक विभागाचा
शंभर टक्के निकाल लागला असून
कु.निशा पुरुषोत्तम पाटील या विद्यार्थिनीने 88.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु.सपना बळीराम बैसाणे हिने 85.00 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तर कु.दुर्गेश्वरी अरुण पाटील हिने 84.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तर चतुर्थ क्रमांक कु.वैशाली राजेंद्र आहेर हिने 82.60 टक्के गुण मिळवून मिळविला. तर पाचवा क्रमांक
कु.प्रियंका शैलेश पाटील हिने 82.40 टक्के गुण प्राप्त करून मिळविला.
सर्व गुणवत्ता प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील, (माजी केंद्रीय दळणवळण मंत्री) तसेच संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. शीलाताई पाटील,
संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत विजय पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री डी. बी. पाटील व प्राचार्या
सौ. गायत्री भदाणे व विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर वृंद व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *