
संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला जीआर रद्द मंत्रालयात धडक.* *राज्यातील कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करू नये व पगार थांबवू नयेत मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण सचिवांना आदेश.
*संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला जीआर रद्द मंत्रालयात धडक.*
*राज्यातील कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करू नये व पगार थांबवू नयेत मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण सचिवांना आदेश.*
ठाणे: कल्याण(मनिलालशिंपी)
दिनांक 15.03.2024 रोजीच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या संच मान्यतेचा जीआर रद्द करावा व त्यातील असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात त्याच बरोबर राज्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळा वाचाव्यात, डोंगराळ भागातील व ग्रामीण भागातील शाळांना फायदा व्हावा याकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे,आमदार अभिजीत वंजारी,आमदार जयंत आजगावकर, आमदार ज. मो. अभ्यंकर,यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांची भेट घेऊन 15.03.2024 चा आदेश रद्द करावा व राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा द्यावा म्हणून भेट घेऊन निवेदन दिले*.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये, व राज्यातील कोणत्याही शिक्षकाचा वेतन थांबवू नये अशी मांगणी सर्व आमदारांनी केली त्यानुसार मा. शिक्षण संचालक यांना शिक्षण मंत्री मा. मंत्री दादाजी भुसे यांनी समायोजन न करण्याचे व कोणत्याची शिक्षकाचे पगार न थांबविण्याचे आदेशित केले.
त्याचबरोबर सर्व आमदारांसमवेत या विषयावर चर्चा करण्याकरिता एक विशेष बैठक लावण्यात येणार असल्याचे मा. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आश्वासन दिले आहे.