
अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन
अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन
अमळनेर प्रतिनिधी – अमळनेरहून गलवाडेकडे जाणारा राज्य मार्ग ६ हा अनेक गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. गलवाडे, झाडी, भरवस, लोन-पंचम, एकलहरे, शहापूरसह अनेक गावांतील लोक आणि अमळनेर आगाराच्या बेटावद, शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा येथील बसेस हे मार्गावरून प्रवास करतात. तरीही, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुंदडा नगर २ च्या पुढे श्री केले सरांच्या घराजवळील वळणावर मोठा खड्डा पडल्याने प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अगोदर अनेक अपघात झाले आहेत..
या खड्ड्यामुळे चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाळवाच्या आणि अवकाळी पावसाच्या काळात खड्ड्याचा विस्तार होऊन आणखी अंदाज लावणे कठीण झाले आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याचा गडद प्रकार स्पष्ट होईनाही, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्ड्यामुळे प्रवासी व मालवाहतुकीला धोका उद्भवलेला आहे. अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करून एक गांधीगिरी केली आहे..
सदर रस्ता १० वर्षांच्या करारावर एक ठेकेदार मेंटेनन्स करत आहे; तरीही या मोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात अपयश झाले आहे. यामुळे, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांना त्वरित ठेकेदाराकडून दुरुस्ती करण्यासाठी निवेदन दिले आहे.
निवेदन देण्याच्या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीपजी घोरपडे, तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज भाऊराव पाटील, तसेच शरद पाटील, काशिनाथ पाटील, पी.वाय. पाटील, प्रताप पाटील, तुषार संदानशिव, तसेच धनगर समाजाचे जेष्ठ नेते बन्सीलाल भागवत, गजेंद्र साळुंखे, दिलीप साहेबराव पाटील, विलास पाटील, भगवान संदानशिव आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने या रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीने कारवाई करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन केले आहे, जेणेकरून गावकऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची हमी मिळू शकेल.