
साने गुरुजी विद्यामंदिरात भावनिक स्नेह मेळावा – शाळेच्या आठवणींना उजाळा
साने गुरुजी विद्यामंदिरात भावनिक स्नेह मेळावा – शाळेच्या आठवणींना उजाळा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक १८.०५.२०२५ रोजी साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा पार पाडला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हेमकांत दादा पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे, माजी मुख्यध्यापक श्री सतीश देशमुख , श्रीमती अनिता बोरसे आणि श्री सुनील पाटील, श्री. संजीव पाटील यांसह आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यानी खूप छान सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलन करून झाली. सौ.वसुंधरा लांडगे यांनी स्वागतोपर गीत गायले. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी विद्यार्थी आशा साळुंखे व मृत्युंजय पाटील यांनी केले. सुरुवातीला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे मनोगत व्यक्त केलेत आणि त्या नंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आजची आणि कालची शिक्षण पद्धती यावर मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. सर्व शिक्षकांचा त्यानी दिलेल्या आपल्या अमुल्य योगदानबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थीनी योगेश्वरी पाटील हिने मैत्री वरील मित्र वणव्या मध्ये गरव्या सारखा ही कविता सादर करून सर्वांची मन जिंकली. वर्गात पून्हा एकदा बाकावर बसून शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला. छोटासा खेळ खेळून मैदानावरील केलेल्या गमती आठवल्या.तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शिक्षकांनी तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी भरभरून कौतुक केले आणि आयोजकांचे विशेष आभार मानलेत. ह्या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी सचिन साळुंखे, उमाकांत हिरे, गणेश पाटील, हितेश पाटील , किरण सोनजे, मृत्युंजय पाटील, सारिका वानखेडे, आशा साळुंखे आणि वृषाली जगताप यांनी केले.