
अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने वेधले शहराचे लक्ष भारतीय सुरक्षा दलांना केले सामूहिक अभिवादन,खा.स्मिता वाघांसह अनेकांची उपस्थिती !
अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने वेधले शहराचे लक्ष
भारतीय सुरक्षा दलांना केले सामूहिक अभिवादन,खा.स्मिता वाघांसह अनेकांची उपस्थिती !
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने १९ रोजी शहरात काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले.संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली.
सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार वाघ यांनी माल्यारपण केल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीत सहभागी सर्व नागरिकांनी सुमारे २०० फूट भव्य तिरंगा ध्वज हाती घेतला होता.तर अनेकांच्या हाती लहान मोठे तिरंगा ध्वज फडकत होते. ओपन जिप्सीवर डॉ .डीगंबर महाले हे तिरंगा ध्वज हाती घेऊन रॅलीचे संचलन करीत होते.
रॅलीत डीजेतून राष्ट्रभक्तीपर गीते निनादत होती.सदर रॅलीत मंगळग्रह सेवा संस्था,खानदेश शिक्षण मंडळ,लायन्स क्लब,रोटरी क्लब,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,मराठा समाज महिला मंडळ,आय एम ए संघटना,निमा संघटना,होमिओपॅथी असोसिएशन,मुंदडा फाऊंडेशन,प्रताप महाविद्यालय,श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी,खान्देश रक्षक संघटना,व्यापारी संघटना,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,व्हॉइस ऑफ मीडिया,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शिवसेना, सुवर्णकार महिला मंडळ,सर्व राष्ट्रीय पक्ष,मुस्लिम समाज बांधव,आजी -माजी सैनिक,व्यापारी बांधव व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
रॅली पाच कंदील चौक,दगडी दरवाजा,पाच पावलीदेवी मंदिर, बस स्टँड,महाराणा प्रताप चौक,कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पोहोचली.
याठिकाणी सर्वप्रथम खा. वाघ यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. खा. वाघ यांनी मनोगतातून पंतप्रधान , गृहमंत्री, संरक्षण मंत्री, भारतीय सैन्यदल आदींचे कौतुक केले. शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्तविक व सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले. अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी आभार मानले.
दरम्यान खासदार स्मिता वाघ यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने अमळनेर करांतर्फे त्यांचा पहिला जंगी सत्कार मंगळग्रह संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन . पाटील सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी केला.