योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे
1 min read

योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे

Loading

योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे

पुणे(पेरणे फाटा): मनुष्यातील षडरिपु नष्ट करण्याची क्षमता योगामध्ये असते. योग साधना प्राचीन शास्त्र असून ऋषिमुनी , तपस्वी यांनी योगाद्वारे ब्रह्मज्ञान प्राप्त केले. योगाद्वारे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते. महान ऋषी चांगदेव योगाच्या बळामुळे चौदाशे वर्ष जीवन जगला.भगवान श्रीकृष्णाचे योग गुरु महर्षी शांडल्य ऋषी होते. भगवान बौद्ध भगवान महावीर योगिक क्रिया आत्मसात केली.
.पतंजली ऋषींनी योगाची संकल्पना सुरू केली. भारत हि योग्यांची व योगाची जननी आहे. योगक्रिया ही विश्वाला दिलेली मोठी देणगी आहे. योगामुळे रोग आणि भोग नष्ट होतात. योगामुळे रोगी हा योगी बनतो. योगामुळे सात्विकता जागृत होते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. जागतिक योगा दिनानिमित्ताने चंद्रप्रकाश धोका कर्णबधिर निवासी विद्यालय पेरणे फाटा येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले की आनंदी, सुखी व रोगमुक्त जीवन जगण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे. योगामुळे अनेक दुर्मिळ आजार कायमस्वरूपी पूर्णपणे बरे होऊ शकतात असे अभ्यासाद्वारे सिद्ध झाले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह दृष्ट समाजसेवक, प्रवचनकार रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई मानव ट्रस्ट उरुळी कांचन,जय श्रीराम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुभाष कट्यारमल, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातील योग गुरु, प्रतिमा दीदी, पालक विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *