“गाईला माता मानतो तर शिक्षा का सौम्य?’ – रोहित महाराजांचा सवाल”  गोरक्षणासाठी आर्त याचना: ‘महाराष्ट्रातही गुजरात प्रमाणे हवा कठोर कायदा
1 min read

“गाईला माता मानतो तर शिक्षा का सौम्य?’ – रोहित महाराजांचा सवाल” गोरक्षणासाठी आर्त याचना: ‘महाराष्ट्रातही गुजरात प्रमाणे हवा कठोर कायदा

Loading

गाईला माता मानतो तर शिक्षा का सौम्य?’ – रोहित महाराजांचा सवाल”

गोरक्षणासाठी आर्त याचना: ‘महाराष्ट्रातही गुजरात प्रमाणे हवा कठोर कायदा

 

अमळनेर प्रतिनिधी
शिंदखेडा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सोमवारी झालेल्या कीर्तनात गोरक्षण व हिंदू धर्म जागृतीचा आवाज बुलंद झाला. या कार्यक्रमात कीर्तनकार रोहित महाराज डोंगरगाव यांनी गोरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडे ठोस मागणी करत भाविकांमध्ये जागरुकता निर्माण केली.
कीर्तनात बोलताना रोहित महाराज म्हणाले, “गुजरातमध्ये जर एखाद्याने गाईची कत्तल केली, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. हरियाणातही गोरक्षणासाठी कठोर कायदे आहेत. मात्र, गाईला ‘माता’ मानणाऱ्या महाराष्ट्रात गोरक्षण कायद्यांत केवळ पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड आहे. ही शिक्षा अत्यंत सौम्य असून, ती गोरक्षकांच्या भावना दुखावणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तात्काळ गुजरातप्रमाणे कठोर गोरक्षण कायदा लागू करावा. हीच आमची गोमातेच्या चरणी न्याय याचना आहे.”
या भाषणाला श्रोत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे हजार भाविकांनी ‘गोमाता की जय’ चा जयघोष करत रोहित महाराजांच्या या मागणीला पाठिंबा दिला. उपस्थितांमध्ये गोप्रेम आणि धार्मिक भावना ठासून भरलेल्या दिसून आल्या.
रोहित महाराजांनी यावेळी हिंदू धर्माची व्याख्या सुद्धा उलगडून सांगितली. त्यांनी ऋग्वेदातील संदर्भ देत स्पष्ट केले की ‘हिंदू’ हा शब्द कोणीतरी काल्पनिक किंवा नवीन दिलेला नसून, त्याचा उल्लेख ऋग्वेदातील बृहस्पती आगम या भागात स्पष्टपणे आढळतो. त्यांनी म्हटले –

“हिमालयं समारभ्य यावत इंदु सरोवरं
तं देव निर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते”

याचा अर्थ, हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंतचा जो प्रदेश आहे तो देवांनी निर्माण केलेला हिंदुस्थान आहे. या देशाचे नाव ‘हिंदुस्थान’ असावे, ही संकल्पना पुरातन ऋषीमुनींनी मांडलेली आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले.
या धार्मिक सप्ताहात कीर्तनासोबतच सामाजिक व धार्मिक मुद्द्यांवर जनजागृती करण्यात येत असून, गोरक्षणासारख्या विषयांना स्थान दिले जात आहे. कार्यक्रमात भाविकांचा उत्साह आणि अनुशासन लक्षणीय ठरले.
हरिनाम सप्ताह पुढील काही दिवस शिंदखेडा येथे सुरू राहणार असून, अनेक नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार आपल्या विचारांनी जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *