
भाजपा कामगार नेते श्री गजानन नागे वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत वह्या वाटप*
*भाजपा कामगार नेते श्री गजानन नागे वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत वह्या वाटप*
*मुंबई* . –भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, गजानन नागे याचें वाढदिवसाच्या निमित्ताने मिरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक १४ मिरागाव शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक मोहन म्हात्रे सौ सुरेखा सोनार, विना भोईर उपस्थित होते,तसेच बेस्ट आगारातील कामगारांना आगारात लाडू वाटप करण्यात आले.याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य, सरचिटणीस हनुमंत अण्णा लांडगे कामगार मोर्चा सरचिटणीस उपस्थित होते, अनेक आगारातील कामगारांनी श्री.गजानन नागे यांचे जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. अनेक मित्र,कामगार नेते आणि हितचिंतकांनी त्यांना जन्मदिन अभिष्टचिंतन करून त्यांना जन्मदिनाच्या तथा निरामय आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.मिरा रोड येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात हे वाढदिवसाचेकार्यक्रम संपन्न झाले.