
मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप.—
मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप.—
मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागामार्फत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 5 विद्यार्थीनींना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली आहे.
यात महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक दिव्यांग, मृत्यू, आत्महत्याग्रस्त व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पाच विद्यार्थीनींना विद्यापीठाकडून रुपये 18,000/- एवढी रक्कम विभागून दिलेली आहे.
सदर योजनेचे धनादेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी. यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी महीला विद्यार्थी विकास प्रा. डॉ. नंदा कंधारे, सल्लागार समिती सदस्या श्रीमती. मंजुषा गरुड, एन. एस. एस. अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पवन पाटील, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप कदम, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय महाजन, ग्रंथालय विभाग प्रमुख ग्रंथपाल प्रा. विजय पाटील, मुख्य लिपिक श्री. जगदीश साळुंखे, श्री.डाॅ.सचिन पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.