
अर्जुन जोशीचे यश: शिष्यवृत्ती परीक्षेत अमळनेर तालुक्यात पहिला!”
“अर्जुन जोशीचे यश: शिष्यवृत्ती परीक्षेत अमळनेर तालुक्यात पहिला!”
अमळनेर: प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी अर्जुन ज्ञानेश जोशी याने अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, जिल्हा स्तरावर ११व्या स्थानावर आपले यश सिद्ध केले आहे.
त्याला शाळेच्या प्राचार्या सिस्टर स्मिता अँथोनी, व्यवस्थापिका सिस्टर डिवाइन आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अर्जुन हा प्रताप महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. पी. जे. जोशी व प्रा. डी. एस. लोहार यांचा नातू असून, उद्योजक ज्ञानेश जोशी व ‘अर्जुन बायोलॉजी क्लासेस’च्या संचालिका सौ. सोनल जोशी यांचा सुपुत्र आहे.
या उत्तुंग यशाबद्दल अर्जुनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.