
“प्लास्टिकमुक्त ब्राम्हणवेल” साठी शाळा व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम संपन्न
“प्लास्टिकमुक्त ब्राम्हणवेल” साठी शाळा व ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम!
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम संपन्न
धुळे प्रतिनिधी
गुरुवार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती साक्री व गट विकास अधिकारी, पं. स. साक्री यांच्या आदेशानुसार कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल आणि ग्रामपंचायत ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने “प्लास्टिक निर्मूलन कृती कार्यक्रम” राबवण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्याध्यापक मा. माळी बी. एन., जेष्ठ शिक्षक माळी के. एन., कलाशिक्षक हिरामण सोनवणे, क्रीडाशिक्षक निकुंभ बी. एस., गणित शिक्षक रविंद्र सूर्यवंशी, लिपिक चेतन महाजन, शिपाई पंडित खैरनार, सुनिल ठाकरे यांनी पुढाकार घेतला.
ग्रामपंचायत ब्राम्हणवेलचे ग्रामसेवक मा. गायकवाड साहेब, कर्मचारी सुनिल चौधरी यांच्यासह इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावातील सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक वेचण्याची शिस्तबद्ध कृती पार पाडली. संपूर्ण परिसरातून प्लास्टिक कचरा संकलित करून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छता व पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. गावकऱ्यांनी या संयुक्त उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व शाळा-ग्रामपंचायतीच्या या कृतीशील कार्याची प्रशंसा केली.
“प्लास्टिकमुक्त गावासाठी एक पाऊल पुढे” या संकल्पनेतून ब्राम्हणवेल गावाने घेतली हरित दिशेने पुढची वाटचाल!