
जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तामसवाडी प्रा.आ. केंद्रास भेट – उत्कृष्ट आरोग्य सेवांचा आढावा व सत्कार सोहळा
जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तामसवाडी प्रा.आ. केंद्रास भेट – उत्कृष्ट आरोग्य सेवांचा आढावा व सत्कार सोहळा
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी NQAS अंतर्गत प्रा. आरोग्य केंद्र तामसवाडी (ता. पारोळा) येथे भेट देऊन सविस्तर तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयाची स्वच्छता, आरोग्य सेवा, औषध साठा आणि वृक्षारोपण यासारख्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
2024-25 या कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. चेतन पाटील, डॉ. चेतन करोडपती व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर ‘आपला दवाखाना – पारोळा’ येथेही भेट देऊन त्यांनी जून महिन्यातील ओपीडी अहवाल, उपलब्ध सेवा व औषध साठ्याची पाहणी केली. शेवटी तालुका आरोग्य कार्यालयात आयोजित बैठकीत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आरोग्यविषयक कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. भायेकर सरांनी जागतिक लोकसंख्या दिन (11 जुलै) आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम याविषयी सखोल मार्गदर्शन करत कुटुंब नियोजनाच्या अंमलबजावणीचे महत्व स्पष्ट केले.