पारोळा तालुक्यातील आरोग्य योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार — राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सखोल आढावा
1 min read

पारोळा तालुक्यातील आरोग्य योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार — राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सखोल आढावा

Loading

पारोळा तालुक्यातील आरोग्य योद्ध्यांचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार — राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सखोल आढावा

अमळनेर प्रतिनिधी
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायकर सर यांनी पारोळा तालुक्यातील “आपला दवाखाना क्र.१”, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण कार्यालय तसेच तालुका आरोग्य कार्यालय यांना भेट देत विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांची तपासणी व पाहणी केली. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करून सत्कार केला.
सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमासह इतर आरोग्यविषयक उपक्रमांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कर्मचारीवर्गात नवीन ऊर्जा व प्रेरणा संचारली.
डॉ. भायकर सरांच्या मार्गदर्शनाने पुढील काळात आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबवली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *