
पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप!
पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप!
धुळे प्रतिनिधी
आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे पाष्टे (ता. शिंदखेडा) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत भव्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये नागरिकांना उत्पन्न, अधिवास, जातीचे, नॉन क्रिमिलिअर आदी महत्त्वाचे दाखले वाटप करण्यात आले.
याशिवाय “जिवंत सातबारा मोहिमे”अंतर्गत टप्पा 1 मध्ये मयत खातेदारांचे वारस हक्काचे सातबारे तर टप्पा 2 मध्ये कालबाह्य नोंदी हटवून सुधारित 7/12 उतारे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये फार्मर आयडी, शिधापत्रिका आदी प्रमाणपत्रांचेही वाटप झाले.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी श्री. शरद मंडलिक, तहसीलदार श्री. अनिल गावंदे, पाष्टे सरपंच मोतीलाल वाकडे, माळीच सरपंच प्रतीक्षा देसले, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळ अधिकारी स्वाती वाघ, ग्राम महसूल अधिकारी व त्यांच्या टीमने केले. सूत्रसंचालनही स्वाती वाघ यांनी प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रमात ऍग्रीस्टेक, पीएम किसान व ई-पिक पाहणी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात नरडाणा, वारुड, माळीच, मेलाणे, जातोडा येथून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य, महसूल अधिकारी, कर्मचारी, तसेच साउंड सिस्टीमसाठी नितीन गुरुव व मंडप सजावटीसाठी सागर कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🌟 एकूणच, शासकीय सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला!