
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा. स्वाती बऱ्हाटे यांची नियुक्ती.
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा. स्वाती बऱ्हाटे यांची नियुक्ती.
जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.श्री.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे यांची नुकतीच के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. प्रा.श्री.आर.बी.ठाकरे भौतिकशास्त्र विभागात तर प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे जीवशास्त्र विभागात गेल्या २२वर्षांपासून कार्यरत आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे, सर्व सन्माननीय व्यवस्थापन मंडळ सदय,प्राचार्य डॉ.एस. एन. भारंबे यांचेसह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.