व्यसनमुक्त समाजासाठी एकता मंचची भव्य नशा मुक्ती रॅली – समाजाला नवसंजीवनी
1 min read

व्यसनमुक्त समाजासाठी एकता मंचची भव्य नशा मुक्ती रॅली – समाजाला नवसंजीवनी

Loading

व्यसनमुक्त समाजासाठी एकता मंचची भव्य नशा मुक्ती रॅली – समाजाला नवसंजीवनी

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):
अंधेरीतील चाचा नेहरू उद्यान, मॉडल टाऊन येथून एक भव्य आणि प्रेरणादायी नशा मुक्ती जनजागृती रॅली आज मोठ्या उत्साहात पार पडली. एकता मंच या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने ही रॅली संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक आणि शिक्षण महर्षी प्राध्यापक अजय कौल सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.

रॅलीचे उद्घाटन सायंकाळी ४ वाजता झाले आणि तिचा समारोप यारी रोड, वर्सोवा येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आला. रॅलीत सहभागी झालेले विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक “Say No to Drugs”, “नशा मुक्त भारत”, “तरुणाईचे नवे स्वप्न – व्यसनमुक्त जीवन” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या रॅलीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला. अमृता फडणवीस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर, भाजपचे आमदार अमित साटम, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार हारुन खान, शिंदे गटाचे विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर, माजी पोलीस अधिकारी समीर वानखेडे, तसेच सुप्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांनी देखील सहभाग घेतला.

रॅलीदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांनी मादक पदार्थविरोधी संदेश असलेले फलक हातात घेतले होते. राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक, अनेक शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाचे डोळ्यांत या सामाजिक कार्यामध्ये सहभागी असल्याचा अभिमान दिसून येत होता.

कार्यक्रमाच्या शेवटी अमृता फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले, “तरुण पिढीला वाचवण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज आहे. अजय कौल सरांनी हा आरंभ करून एक सकारात्मक लाट निर्माण केली आहे.”

प्रा. अजय कौल यांनी या वेळी बोलताना सांगितले, “आजच्या तरुण पिढीसमोर व्यसनांचे मोठे संकट आहे. या संकटावर मात करून त्यांना समाजकार्यासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.”

ही रॅली एक सामाजिक चळवळ बनावी आणि देशभर नशा मुक्तीचा संदेश पोहोचावा, हीच एकता मंचची महत्त्वाकांक्षा आहे. उपस्थितांनी देखील हा संदेश अधिकाधिक पसरवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *