
ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड
ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड
जळगांव प्रतिनिधी
शालेय जीवनातला आनंद हा आपल्याला मैत्री दृढ करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा असतो ज्ञानासोबतच स्वतःला चांगला नागरिक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात जनसाहस, सोशल डेव्हलपमेंट व विशाखा समिती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या एकूणच व्यक्तिमत्व विषयी व त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जाताना कशा पद्धतीने अडचणी सोडविता येईल या संदर्भात समुपदेशक चित्रा बढे व तेजल पाटील यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शनात त्यांनी गुड टच आणि बॅड टच याविषयी माहिती देऊन विद्यार्थी, विद्यार्थिनींची जवळची मैत्रीण आई असते स्वतःचे मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी भावना व्यवहार आणि विचार हे त्रिसूत्र विद्यार्थ्यांनी अंगी बाणले पाहिजे यासाठी सतत आपण संवाद साधण्याची गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले, वैशाली सोनवणे यांनी देखील विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले कार्यक्रमास संस्थेचे सचिव विलासराव चौधरी,प्रदीप राजपूत,मनोज पाटील,संजय देशमुख, एल.जे.पाटील उपस्थित होते प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर सूत्रसंचालन विशाखा समिती प्रमुख वृषाली चौधरी यांनी केले आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले.