
शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
जळगांव प्रतिनिधी
दि. १९/०७/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली तसेच नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी नेत्र तपासणी केली. या सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधी देण्यात आली तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात आलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन केले. कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, प्राची खालसे, देवयानी चव्हाण उपस्थित होते.तसेच शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक गोविंदा लोखंडे, नितीन अटवाल, भागवत भावसार, मनीषा चौधरी इ. शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. नवल परदेशी, शाळेचे मुख्याध्यापिका. श्रीमती संगीता पाचपांडे, श्री.यशवंत गुजर सर यांनी मेहनत घेतली…
तसेच प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी करून देण्याचे आश्वासन श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज त्यांच्याकडून देण्यात आले आहे.