
डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………*
*डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………*
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी.यू.एन.रायसोनी विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनात आजपासून बी.यू.एन.रायसोनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरवात झाली १९ जुलै ते २५ जुलै दरम्यान आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार्थी किशोर चौधरी यांनी मैदान पूजन करून व श्रीफळ वाढवून केले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, नाशिक विभागीय शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, बी.यू.एन. रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील यांची उपस्थिती होती याप्रसंगी जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचा खेळाडू विनायक सपकाळे याची जपान येथे होणाऱ्या वर्ल्ड डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी बालविश्व विद्यालयाच्या अध्यक्षा सौ. भारती चौधरी, संचालक सौरभ चौधरी, निस्वार्थ जनसेवा फाऊंडेशनचे सचिव धीरज जावळे, जिल्हा खेलो मास्टर्स असोसिएशनचे सहसचिव जितेंद्र फिरके, राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू चैताली पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन धनराज भोई यांनी केले शिबिरात मार्गदर्शक म्हणून योगेश सोनवणे व आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायक सपकाळे हे मार्गदर्शन करीत आहे दररोज दुपारी ३ ते ५ दरम्यान होणार असलेल्या या शिबिरात विविध शाळा महाविद्यालयाचे १२२ खेळाडू सहभागी झाले आहेत खेळाडूंना डॉजबॉल खेळाची माहिती व्हावी त्यातील तंत्र,डावपेच, कौशल्य, नियम, साहित्य, मैदान,पंचकार्य, प्रत्यक्ष खेळ, पूरक खेळ, खेळासाठी आवश्यक उत्तेजीत व्यायाम प्रकार, खेळातील अडचणी यावर मार्गदर्शन करण्यात येत असून अजूनही ज्या क्रीडा शिक्षक व खेळाडूंना या शिबिरात सहभागी व्हायचे असेल त्यांनी योगेश सोनवणे यांचेशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक, जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव व बी.यू.एन.रायसोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.