धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..  ▪️गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व “शिवाजी कोण होता?” ग्रंथ भेट !
1 min read

धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.. ▪️गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व “शिवाजी कोण होता?” ग्रंथ भेट !

Loading

धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

▪️गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व “शिवाजी कोण होता?” ग्रंथ भेट !

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव : येथील मोठा माळी वाडा समाज सभागृहात इ.दहावी ते उच्च पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्कृष्ट यशासह विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव सोहळा समारंभाचे प्रास्ताविक आर डी महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन होते. तसेच विचारमंचावर उद्योजक भगवान महाजन, लहान माळी वाडा समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, मधुकर माळी, दशरथ बापू, विजय महाजन, कैलास माळी, के आर वाघ, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, रमेश जगताप, पी डी पाटील, प्रा. कविता महाजन, कु.भावना महाजन, रामचंद्र माळी, योगराज बागुल, राजेंद्र महाजन, वाय पी पाटील, गोपाल महाजन, तुळशीराम भगत, गणेश महाजन, हभप पांडुरंग महाजन, आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहर परिसरातील असंख्य विद्यार्थी चांगल्या टक्केवारीमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे माळी समाजाच्या वतीने प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थी मनोगतामध्ये राज महाजन, कु.भावना महाजन यांनी यशाची गुरुकिल्ली मेहनत चिकाटीने अभ्यास करा व यश मिळवा आणि आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा असा संदेश दिला. उपस्थित मान्यवरांमध्ये आर डी महाजन, कैलास माळी, ज्ञानेश्वर महाजन, गुलाबराव वाघ, भगवान महाजन यांनी मनोगतातुन गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे समाजासह, शहराचा गौरव वाढवला असून अश्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे आपले व प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवा आणि आपल्या गावाचे, परिवाराचे नाव मोठे करा. त्याचप्रमाणे राज उत्तम माळी ह्या विद्यार्थ्याकडून गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ? ” या ग्रंथाचे गुणवंत विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. गुणगौरव सोहळा यशस्वीतेसाठी हेमंत माळी, नितेश माळी, शिपाई कैलास वाघ, श्रीकांत महाजन, जयेश जगताप, अमोल महाजन, शुभम महाजन, अनिल वाडीले, शरद जाधव, राजेंद्र वाघ, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष विनोद माळी यांनी तर आभार सचिव गोपाल माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *