
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
– महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनप्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुक्याचे माजी आमदार मा. आबासो डॉ. बी.एस. पाटील, प्रा. अशोक पवार सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, ज्येष्ठ नेते संदीपजी घोरपडे, प्रताप आबा,प्रा श्याम पवार सर, शरद नाना भागवत गुरुजी, सुलोचनाताई वाघ, योजना ताई पाटील, प्रा. सुभाष पाटील, शिवसेनेचे चंद्रशेखर भावसार, गोकुळ कोळी, देवेंद्र देशमुख, डॉ. रवींद्र पाटील, ज्येष्ठ नेते मनोहर नाना निकम, भास्कर बोरसे, सिंधू वानखेडे, मनोज बापू, कैलास आप्पा, मनोहर पाटील, योगेश सिसोदे व अन्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजेंद्र साळुंखे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीकडून राज्य सरकारवर केलेले हे आंदोलन आणि निवेदन सध्या तालुक्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.