हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो, प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!” , नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम”
1 min read

हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो, प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!” , नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम”

Loading

हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो,
प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!”

नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
कळमसरे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा लाडका मुलगा नितीन याचे निधन २२ जुलै १९९७ रोजी झाले. त्यावेळी तो अवघा नववीत शिकत होता—हुशार, चाणाक्ष, शांत स्वभावाचा, घरच्यांचा आणि शिक्षकांचा लाडका. काळाच्या क्रूर झटक्याने नितीनला हिरावून घेतले, पण त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

 

 

गेल्या २८ वर्षांपासून, पित्याने नितीनच्या स्मृतीप्रित्यर्थ शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील नववीच्या वर्गातील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुरू ठेवले आहे. ही परंपरा म्हणजे केवळ श्रद्धांजली नव्हे, तर एक भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनली आहे.
यंदाही हा उपक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डी. डी. जाधव सर, सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव चौधरी सर, दिनेश टाक सर, ज्येष्ठ शिक्षक व्ही. पी. महाजन सर, गणेशनाना चौधरी, संजय चौधरी, भीमराव चौधरी, अशोक चौधरी यांची उपस्थिती होती.
प्राचार्य जाधव सरांनी सांगितले,“एखाद्या अपत्याच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी एवढी वर्षे समाजसेवेचा दीप सतत तेवत ठेवणे हे विलक्षण आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमात नितीनच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले. नितीनच्या आठवणी आजही त्याच्या परिवारासह संपूर्ण शाळा आणि गावाच्या मनात घर करून आहेत.
एका अपत्याच्या अपूर्या स्वप्नांना समाजसेवेच्या माध्यमातून पूर्णत्व देणारे हे कार्य खरंच नतमस्तक व्हावे असेच आहे.
श्रद्धांजली नितीन… आणि सलाम पित्याच्या अढळ प्रेमाला!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *