
गणिताचा उत्सव… ए.टी. झांबरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय दिवस रंगतदार कार्यक्रमाने साजरा
गणिताचा उत्सव… ए.टी. झांबरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय दिवस रंगतदार कार्यक्रमाने साजरा
जळगांव प्रतिनिधी
22 जुलै हा आंतरराष्टीय पाय दिवस या निमित्ताने ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात गणित मंडळाची स्थापना करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना गणितीय रांगोळी हा उपक्रम देण्यात आला अतिशय सुंदर पद्धतीने इयत्ता आठवी नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळ्या सादर केल्या. कार्यक्रमासाठी पी.एस. एम एस शाळा बामणोद येथील उपशिक्षक श्री.प्रमोद नेमाडे सर हे प्रमुख पाहुणे होते. तिच्या हस्ते गणितीय रांगोळ्यांचे उद्घाटन करून गणित मंडळाची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या.तसेच पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे सर, पुनम कोल्हे, नूतन वराडे , उपस्थित होते. कार्यक्रमात 22 जुलै हा दिवस पाय दिवस साजरा का करण्यात येतो त्याची माहिती संस्कृती खैरनार आणि केतन पाटील यांनी स्पष्ट केले.तसेच गणित मंडळाचे प्रमुख श्री.महेंद्र नेमाडे सर यांनी पाय ही संकल्पनाπ=22/7 आणि 22जुलै हा दिवस यांचा समन्वय एल.सी. डी द्वारे स्पष्ट केला.
गणितीय रांगोळी स्पर्धेत मेघा वाणी गुंजन पाटील मृदुला चव्हाण आणि प्रेम पाटील हे विद्यार्थी यशस्वी ठरले या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मनिषा जयकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे गणित मंडळाचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.