योग करा आणि निरोगी रहा!!!
योग करा आणि निरोगी रहा!!!


योग ही पारंपारिक ध्यानाची पद्धत आहे जी प्राचीन भारतातील संतानी विकसित केली आहे. योगाचा उपयोग मनावर आणि शारीरिक कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील केला जातो. योग हा संस्कृत शब्दापासुन उद्भवला आहे ज्याचा अर्थ “सामील होणे, एकत्र होणे ” आहे. “योग” शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते.
योगाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे ध्यानधारणा करुन आणि दुसरा म्हणजे योगासने करून. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे उत्तम योगासने आहेत. वज्रासन, ताडासन, मत्स्यासन, धनुरासन हे काही प्रकार होत अनुक्रमे उंची वाढविणे, पोट, शरीर या साठी ही आसने फार लाभदायक आहेत.
सिद्धासन, शीर्षासन, सर्वांगासन, मत्स्यासन, अर्ध मत्सेद्रासन, हलासन, चक्रासन आणि मयुरासन हे सर्व मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत तर धनुरासन, पश्चिमोत्तासन, सुप्तवज्रासन आणि मत्स्यासन यामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेदना कमी होतात आणि पद्दासन, सिद्धासन, सिंहासन, वीरासन, उत्कटासन, , सुप्तवज्रासन, वृक्षासन, शलभासन, भुजंगासन आणि हलासन यामुळे त्वचेचे आजार,गर्भाशय आणि बीजाशयाचे आजार कमी होतात.
योगासनाचे फायदे
१. योगासनांमुळे मल आणि शरीरातील इतर टाकाऊ पदार्थ व्यवस्थितपणे उत्सर्जित होतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर व्याधी मुक्त होते.
२. योगासनांमुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि त्यामुळे मानसिक शक्ती वाढते आणि बुद्धीचा विकास होतो.
३. योगासनांमुळे शरीर लवचिक बनते. त्यामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो, काम करण्याची शक्ती वाढते आणि मनुष्याची कांती तेजस्वी बनते.
४. योगासनांमुळे बद्धकोष्ठता, वायुविकार, मधुमेह, रक्तदाब, अंत्रवृद्धी व डोकेदुखी यांसारख्या व्याधी बऱ्या होऊ शकतात. योगासनांमुळे हृद्य व मज्जारज्जू सशक्त बनतात.
५. वयस्कर स्त्री-पुरुष देखील योगासने करू शकतात. ही व्यायाम पद्धती संपूर्ण भारतीय आहे. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून ही पद्धत स्वीकारली होती. त्यामुळे, दीर्घकाळापर्यंत ते स्वस्थ व निरोगी जीवन जगू शकत होते.
६. नियमितपणे योगासने करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात कोणतीही अशुद्धता राहत नाही, तिचे मन शांत व प्रसन्न राहते.
असे विविध फायदे असणाऱ्या योगासने योग्य पद्धतीने करण्यासाठी मी “ॐ योगा क्लास” लावलेला असुन तिथे आम्हाला सौ-कविता सोनार मॅडम वरील सर्व योगासने अगदी साधक- बाधक पद्धतीने आमच्या कडून करुन घेत आहेत.तेथे दोन बॅच मध्ये सकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8 या वेळेत योगा क्लास प्रसन्न जेष्ठ मंडळ शिवकॉलनी.ता-जि- जळगाव येथे घेतला जातो.
भारताच्या फार प्राचीन काळापासून योगाभ्यास करण्याची परंपरा चालत आली आहे. शरीराचे आंतर-बाह्य भाग निरोगी ठिवण्याची क्रिया म्हणजे ‘योगासने’. हे भाग जोपर्यंत निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्याप्रकारे करता येत नाही. व्यायामाच्या इतर पद्धतींच्या तुलनेत योगासन पद्धती अधिक लाभकारक आहे.
श्रीम. वैशाली रमेश बाविस्कर
शिवकॉलनी जळगांव.
मो. नं.- 9284009086