भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. कैलासआप्पा सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब जळगाव वेस्टचा अध्यक्षा सरिता खाचणे, विवेक काबरा, मुनिरा तरवारी, सामाजिक युवा कार्यकर्ते कल्पेश सोनवणे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी स्वरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी नृत्य स्वरूपात इशस्तवन सादर केले. तर इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक श्री. एस.एस.बाविस्कर यांनी केले. दरवर्षी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला जातो. समाजातील विविध दात्यांनी ठेव म्हणून ठेवलेल्या विशिष्ट रकमेचे व्याज व रोख स्वरूपातील काही रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येते. यात विद्यालयात वर्षभरात विविध उपक्रमात भाग घेऊन प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक दिले जाते. यात एस.एस.सी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अश्विनी सोनवणे, द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल योगेश राठोड, तृतीय क्रमांक व गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गजानन पिंटू कोळी, विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पौर्णिमा सोनावणे, व यश दत्तात्रय कोळी याने समाजशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोख पारितोषिक देऊन तर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा देखील विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.तसेच आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार व उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार देखील देण्यात आले मुख्याध्यापक श्री.एल.एस.तायडे यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख योगराज सोनवणे यांनी तर आभार सुवर्णसिंग राजपूत यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.
