• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे

Feb 12, 2024

Loading

माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे

निमित्त कोणतीही असो सामाजिक कार्याशी आमची बांधिलकी आहे- डॉ. रामचंद्र देसले
मनीलाल शिंपी, किशोर पाटील व सर्व ग्रुपचे आमच्या अपंग सेवा संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार- अशोक भोईर
कल्याण येथे
दिव्यांग महिला व बांधवांना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने ७० रेशन किटचे वाटप!
ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी, डॉ.मनिलाल शिंपी व सौ. संगिता शिंपी यांच्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसानिमित्त, साईबाबा मंदिर, योगिधाम कल्याण पश्चिम येथे, लेडीज एक्स्प्रेस ग्रुपच्या श्रीमती मधूबेन ठक्कर, सुंदरकांड ग्रुप महिला मंडळ, जायंट्स ग्रुप ऑफ मिडटाऊन, सहेली ग्रुप, गीता मिश्रा, रविंद्र बारापात्रे,यांच्या सहकार्याने, दिव्यांग अपंग बंधू भगिनींना ( जीवनावश्यक वस्तूंचे) रेशन किटचे वाटप विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, उद्योजक, समाजसेवक डॉ.रामचंद्र शांताराम देसले, पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्री.सोमनाथ बाळाराम ठाकरे, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ.दिनेश भाई ठक्कर, शिंपी समाज कल्याण चे उपाध्यक्ष अरविंद शिंपी, आर एस पी अधिकारी युनिट चे विभागीय समादेशक दिलीप स्वामी,जितेंद्र सोनवणे, राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा,कन्यादान सामुदायिक विवाह सदस्या श्रीमती उषा कनोजिया,शिंपी समाज विश्वस्थ श्री.विजयनाना बिरारी, श्री.रामेश्वरजी धाडणकर, कल्याण शिंपी समाजाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी, मराठी अभिनेत्री करुणा काथकडे, राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा, इच्छामनी भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगिता पस्टे,सौ. नाईक, विरांगणा युनिटच्या प्रमुख आशा (अंजली) वैशनेय, साई मंदिर संस्थानचे प्रमुख श्री. दास जाधव, व जायंट्स ग्रुप मिडटाऊन सहेली ग्रुपच्या डिंपल दहिफळे, कौशल्या पाटील, बिना सूचक,रक्षा तन्ना, नेव्ही सेंट्रल इंडिया चे श्री.मिश्रा व सौ.गीता मिश्रा,समाजसेवक लक्ष्मण तरे व आदी मान्यवर उपस्थित राहून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. सर्वप्रथम मी मानव सेवा ग्रुपच्या प्रमुखांना लग्नाच्या वाढदिवसाच्या आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा देतो कारण त्यांच्यामुळेच आज मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपची निर्मिती झाली आहे, त्यामुळे ह्या ग्रुपशी जे जे जोडले जातात त्या सर्वांचा सहभाग कोणताही कार्यक्रम असला तरी खारीचा वाटा का होईना परंतु घेतला जातो व ते स्वखुशीने देतात त्यामुळे आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून माणसात देव शोधण्याचे काम करत आहोत असे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. गेल्या चार वर्षापासून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपमध्ये मी सदस्य म्हणून जोडलो गेलो आहे, त्यामुळे ग्रुपच्या माध्यमातून कोणतेही कार्य असो व त्यासाठी कोणतेही निमित्त असू दे आम्ही सामाजिक बांधिलकी जपून आमच्या परीने जे काही शक्य होईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, व ग्रुपचे प्रमुख यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असे भोकरी गावचे समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपचे मुख्य दोन प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.किशोर पाटील साहेब तसेच सर्व ग्रुपचे सभासद यांचे आम्ही आमच्या अपंग सेवा संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आमच्यासाठी जे काही केले ते अनमोल आहे असे आम्हाला वाटते, व खरंच ज्यांना गरज आहे अशीच नावांची यादी मी या ठिकाणी पाठवली. त्यामुळे योग्य व्यक्तीला मदत मिळाली म्हणूनच मी पुनश्च आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो असे राष्ट्रपती पुरस्कार विजेते अपंग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक भोईर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांनी मानले. तर साई संस्थान मंदिराचे प्रमुख श्री दास जाधव आणि सौ. जया जाधव, यांच्यासह साई मंडळाचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.आणि श्री.दास जाधव यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *