• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत माऊली जय गजानन पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा

Feb 13, 2024

Loading

जाहिरात..

पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत माऊली जय गजानन पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त पाठिंबा

अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्था मर्यादित अमळनेर
२०२३-२८ च्या पंचवार्षिक निवडणूक
श्री माऊली जय गजानन पँनल

पूज्य साने गुरुजी पतपेढीच्या हितासाठी निस्वार्थ सेवेसाठी आणि विकासासाठी आमची उमेदवारी…

मतदानाचे ठिकाण
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल कुंटे रोड पवन चौक अमळनेर

मतदानाची वेळ
रविवार
18 -2- 2024
सकाळी आठ ते दुपारी ४ वाजेला

नुकताच माऊली जय गजानन पॅनल चा प्रचार नारळ मारुती मंदिरात जेष्ठ मार्गदर्शक व पतपेढीचे सभासद यांच्या हस्ते प्रचार सुरू झाला आहे. प्रचार नारळ प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.. सभासदांचे हित व पतपेढीच्या विकासासाठी व माऊली जय गजानन पॅनल विजयी करा असे आवाहन करण्यात आले.. यावेळी अमळनेर तालुक्यातील अनेक सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माऊली जय गजानन पॅनल मध्ये अनुभवी व नवीन चांगले उमेदवार पँनल प्रमुखांनी
दिले आहेत यांना जास्तीत जास्त मतदान करून भरगोच्च मतांनी निवडून द्यावे..व
सेवेची संधी द्यावी असे आवाहन पॅनल प्रमुख राजेंद्र पाटील, सचिन साळुंखे मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, दीपक पाटील
यांनी आवाहन केले आहे..
माऊली जय गजानन पॅनल निवडून आल्यानंतर त्यांनी सभासद जनहितार्थ आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे..

जाहीरनामा

1)माध्यमिक पतपेढी पेक्षा व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करू.
2) दोन मुलं असलेल्या सभासदांच्या मुलांपैकी एका मुलाच्या लग्नप्रसंगी सुकन्या योजनेप्रमाणे रुपये 5000 चा लाभ देऊ.
3) साने गुरुजी पतसंस्थेच्या सभासद पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करू.
4) सध्या देत असलेल्या डिव्हीडंट प्रमाणेच भविष्यातही डिव्हीडंट देऊ..
5) आपल्या वर्गणीची खात्रीशीर सुरक्षित ठेऊ.
6) पु.साने गुरुजी पतसंस्थेचे वैभव उत्तरोत्तर वाढवू आणि उत्तम सेवा देऊ.

म्हणून सर्व सभासदांना कडकडीची विनंती आहे की आता नाही तर कधीच नाही ही आपणास संधी आहे.. माऊली जय गजानन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरगोच्च मतांनी निवडून सेवेची संधी द्यावी ही विनंती..

आशिष दिलीपराव शिंदे
अध्यक्ष
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर जिल्हा जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *