• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साने गुरुजी शिक्षक पतपेढीची निवडणुक माऊली पॅनल व सहकार पॅनलसाठी बनली प्रतिष्ठेची

Feb 14, 2024

Loading

साने गुरुजी शिक्षक पतपेढीची निवडणुक
माऊली पॅनल व सहकार पॅनलसाठी बनली प्रतिष्ठेची

अमळनेर प्रतिनिधी – पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतसंस्था अमळनेर 2023- 28 च्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री माऊली जय गजानन पॅनल व सहकार पॅनल यांच्यामध्ये निवडणुकीचे प्रचार नारळ फोडल्यानंतर जोरदार प्रचार सुरू आहे.
माऊली जय गजानन पॅनलचे प्रमुख व साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र पाटील हे आहेत तर सहकार पॅनलचे प्रमुख मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षके पतपेढीचे संचालक तुषार बोरसे आहेत.
दोन्ही पॅनलांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.. रविवारी 18 फेब्रुवारीला मतदान व निकाल घोषित होणार आहे यासाठी ही निवडणूक प्रत्येक पॅनल साठी प्रतिष्ठेची ठरली आहे सभासद कोणाला कौल देतील हे येणारा काळ ठरवणार आहे..
दोन पॅनल व्यतिरिक्त काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहे त्यांचाही प्रचार प्रसार जोरात सुरू आहे.. जनरल गटातून सहा जागा असून महिला राखीव इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आहेत.
एकाच शाळेतील दोन शिक्षक ओबीसी मतदारसंघातून समोरासमोर लढत होणार आहे.
साने गुरुजी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र श्रीराम पाटील उर्फ राजू सर तर माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार संजय कृष्णा पाटील हे समोरासमोर दोन्ही पॅनलचे उमेदवार ओबीसी प्रवर्गातून उभे आहेत. यांच्या उमेदवारीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.. कोण बाजी मारणार? सभासद कोणाला कौल देणार ?हे लवकरच समजणार आहे…
सध्या तरी दोन्ही पॅनलच्या प्रचार जोरात सुरू आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *