
पिंपळे आश्रम शाळेत डोळ्यांचे विकार, मधुमेह, लठ्ठपणा विकारासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय यांवर तज्ञ डॉ कौस्तुभ ठाकूर यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ. पाटील प्राथ.व यशवंत माध्य.आणि उच्च माध्य.आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु. ता. अमळनेर, जि.जळगाव येथे माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत बालवयातच येऊ घातलेल्या डोळ्यांचे विकार, मधुमेह व लठ्ठपणा यासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय यावर तज्ञ मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर व्याख्याना करिता अमळनेर येथील डॉक्टर कौस्तुभ ठाकूर (दृष्टी हॉस्पिटल) यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना नवीन डिजिटल युगात, बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांचे होणारे विविध विकार, बाल वयातच येणारा लठ्ठपणा व मधुमेह याची कारणे काय व त्यावर कोणकोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी संबंधित आजारांविषयी आपल्या शंका कुशंका देखील डॉक्टरांना विचारल्या व त्यांनी समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांना पूरक असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकरिताआरोग्य संबंधित ‘डॉक्टर दिवस’ देखील साजरा करण्यात आलेला होता व “विप्रो संघातर्फे नेत्र तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आलेले होते त्याचा विशेष उल्लेख सरांनी आपल्या व्याख्यानात केला. व सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राथ.मुख्या.अविनाश अहिरे व माध्य मुख्या.उदय पाटील यांच्या नियोजनानुसार करण्यात आलेले होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता हेमंत पाटील,माधुरी पाटील, प्रतीक पाटील, रवींद्र नेरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र नेरकर व आभार प्रदर्शन माध्य मुख्या. उदय पाटील यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा ताईसौ विद्याताई युवराज पाटील व सचिव नानासाहेब युवराज दगाजीराव पाटील यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.