१० वी १२ वीच्या परीक्षा काळात शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा घाट घातला जात असून या प्रशिक्षणाला विरोध करीत ट्रेनिंग पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे
नवीन शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शिक्षकांना “शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण” देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांना नुकतेच खोपोली येथे प्रशिक्षण देण्यात आले
या प्रशिक्षणात पुढील आठवड्यात मुंबईतील ४ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तथापि शिक्षकांना १० वी व १२ वीचे विज्ञान प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, बोर्डाची ऑनलाइन कामे करावयाची आहेत दिनांक १ मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये अशी मागणी बोरनारे यांनी केली आहे