• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक

Jun 26, 2024

Loading

  1. शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक

उमेश काटे : अमळनेर येथील आर्मी स्कुल मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा

अमळनेर – छत्रपती शाहू महाराज हे शिक्षणाबाबत फारच जागृत होते. त्यांच्याकडे उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी होती, म्हणूनच त्यांनी आजच्या शंभर वर्षांपूर्वीच प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे आजच्या केंद्र व राज्यशासनाला मार्गदर्शक ठरीत आहेत, असे मत राज्य सैनिकी शाळा कृती समितीचे राज्य समन्वयक उमेश काटे यांनी व्यक्त केले. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये झालेल्या युवा कल्याण प्रतिष्ठान (अमळनेर) द्वारा संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधिनी अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रा अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या एक दिवसीय 100 वक्ते आणि 100 व्याख्यान मालिकेच्या शुभारंभ यावेळी करण्यात आला.
प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील हे अध्यक्षस्थानी होते. नायब सुभेदार बी पी पाटील, शिवाजी पाटील आदी सह सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी नैतिक जाधव, शिवप्रसाद चतुर, नेहान माळी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेश काटे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी पवन पाटील, देवेंद्र पाटील, कल्पेश हटकर, सुमित कचवे या विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले. प्रामाणिकपणा दाखवील्याबद्दल ओम हटकर या विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले. पवन पाटील याने सूत्रसंचालन केले. शैलेश माळी याने आभार मानले. कल्पेश पाटील याने छायाचित्रण केले.
—–
अमळनेर – गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत सुभेदार मेजर नागराज पाटील, उमेश काटे, बी पी पाटील, शिवाजी पाटील आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *