• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते तलाठी यांनी केले बंद

Jun 27, 2024

Loading

सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते तलाठी यांनी केले बंद
मुंगसे ता अमळनेर दि२६ (वार्ताहर ) > येथून जवळच असलेल्या सावखेडा व धावडे, ता. अमळनेर येथील तापी नदीपात्रालगतचे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद करण्यात आले आहेत . सविस्तर वृत असे की मागील काही दिवसांमध्ये सलग अवैध गौण खनिज वाहनांवर तलाठी सावखेडा तसेच पथकामार्फत कारवाई करण्यात आल्याने. यामुळे वाळू वाहतुकीला आळा बसणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
– सावखेडा येथील
तलाठी सतीश शिंदे, पोलीस पाटील महेश पाटील नागरिक किशोर माळे . धावडे .यांच्या उपस्थितीत जेसीबी यंत्रणेच्या साहाय्याने चोर रस्त्यांमध्ये चाऱ्या खोदून बंद करण्यात आले आहेत .
तसेच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असल्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून सावखेडा व धावडे या दोन्ही गावांमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या महसूलच्या या उपाययोजनेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. या कामाचे परिसरातून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *