मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार अनधिकृत बार,ढाबे,गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे कारवाई करावी !
डॉ.इंदुराणी जाखड़
कल्याण( मनिलाल शिंपी)मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार अनधिकृत बार ढाबे,गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड़ यांनी आज दिले, या विषयाबाबत परिमंडळ-३-चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त कल्याण व डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा.आयुक्त व इतर अधिकारी वर्ग यांचे समवेत आज संपन्न झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले आहेत.
*कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बार-गुटखा पार्लर पान टपऱ्या ढाबे व इतर ज्या ठिकाणी अल्पवयीन मुली-मुलांना मद्य विक्री केली जाते,अशा सर्व ठिकाणी त्वरीत कारवाई करावे,असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.या संदर्भात महापालिकेच्या सर्व प्रभागातील सहा. आयुक्तांनी यापूर्वीच नोटीसा बजाविल्या असून पुढील कार्यवाही आता सुरु करण्यांत आली आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली*
*ज्या अनधिकृत बार व तत्सम ठिकाणी पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले आहेत त्याची यादी त्यांनी महापालिकेस दिली असून,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्रगतीने कारवाई करण्यात येईल,अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे*