• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात किशोरभाऊ दराडे विजयी..

Jul 2, 2024

Loading

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात कर्मचाऱ्यांची किशोरभाऊ दराडे यांना पसंती

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व राज्यातील 26 हजार पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून अधिवेशन पूर्वी मार्गी लावतील….

पेंशन पीडित कर्मचाऱ्यांना अपेक्षा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक खूपच चुरशीची झाली होती.. विद्यमान किशोरभाऊ दराडे यांनी मागच्या वेळी शिक्षक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते,जुनी पेन्शनसाठी मोठा लढा उभारला,कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत केले, कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न असेल दराडे यांनी तो मार्गी लावला त्याच्यामुळे दराडेंना विशेष पसंती कर्मचाऱ्यांकडून होती हे तेवढे सत्य.. त्यात त्यांच्या उमेदवाराचा होम टू होम व शाळा टू शाळा प्रत्येक कर्मचाऱ्यांची संवाद साधून होते.. कर्मचाऱ्यांची भाषा अत्यंत मवाळ होती त्यामुळे प्रचार करतांना त्यांना कोणताही त्रास झाला नाही.. त्यामुळे ते निवडणुकीमध्ये त्यांची आघाडी राहिली पण त्यांचे प्रतिस्पर्धी मातब्बर उमेदवार ठाकरे गटाचे अँड संदीप गुळवे,अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या तिघांमध्ये निवडणूक चुरशीची होणार होती.. बातम्यांमध्ये सुद्धा गुळवे यांना आघाडी दाखवत होते पण नंतर किशोरभाऊ दराडे आघाडीवर राहिले व त्यांनी आपला विजय मिळवला व पुन्हा शिक्षक आमदारकीपदी निवडून आल्यामुळे सर्व पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे..
किशोरभाऊ दराडे1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेली राज्यातील 26000 पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनीही केस साठी ती लढत आहेत.. जुलै महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टात पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा निकालाची प्रतीक्षा आहे त्या अगोदर शासनाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर केले तर लागलीच निकाल लागून पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे सरकारला त्याच्या फायदा होईल हे तेवढे सत्य आहे…
प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावला आले असता त्यांनी सभेमध्ये शब्द दिला आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न अधिवेशनामध्ये मार्गी लावेल.. तुम्ही फक्त दराडेंना निवडून द्या असे आवाहन केले होते ते आता शब्दाला टिकतील का? किशोर भाऊ दराडे हा प्रश्न सोडतील का? असे प्रश्न पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांसमोर आहेत पण पेन्शनच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे किशोरभाऊ दराडे ही अधिवेशनापूर्वीच मार्गी लावतील हे तेवढेच सत्य आहे अशी चर्चा पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे…
किशोर भाऊ दराडे निवडून आल्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळेल व त्या सोडवतील अशी आशा नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांना आहे..
नाशिक विभागातील सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी किशोरभाऊ दराडे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे..

*शिक्षक आमदारकी निवडणुकीतील मताची आकडेवारी*

एकूण मतदान – 64 हजार 853

➡️ किशोर भिकाजी दराडे : 26476
➡️ अँङ गुळवे संदीप गोपाळराव (पाटील) : -16280
➡️ ॲड महेंद्र मधुकर भावसार :131
➡️ कोल्हे विवेक बिपिनदादा: 17372
➡️ भागवत धोंडीबा गायकवाड : 9
➡️ अनिल शांताराम तेजा : 7
➡️ अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे : 259
➡️ इरफान मो इसहाक : -17
➡️कचरे भाऊसाहेब नारायण :1195
➡️ कोल्हे सागरदादा रविंद्र :66
➡️ कोल्हे संदीप वसंतदादा : 74
➡️ गव्हारे गजानन पंडीत : 151
➡️ गुरुळे संदिप वामनराव : 152
➡️ झगडे सचिन रमेश :107
➡️ दिलीप काशिनाथ डोंगरे: 78
➡️ आर.डी.निकम : 552
➡️ पै.डॉ.पानसरे छगन भीकाजी :10
➡️ बोठे रणजित नानासाहेब: 0
➡️ महेश भिका शिरुडे : 15
➡️ रतन राजलदास चावला : 68
➡️ संदीप गुळवे पाटील : 132
➡️ वैध मते : 63151
➡️ अवैध मते : 1702

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *