शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण : विजय लुल्हे
[ गुणवंत शिक्षकांचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे गुरुपौर्णिमेला हृद्य सत्कार ]
” शिक्षणव्यवस्थेच्या अतिरेकी प्रयोगशीलतेने गुरुशिष्य परंपरेचे झाले बाजारीकरण.विद्यार्थ्यांमध्ये आजकाल शिक्षकांबद्दल आदर,श्रद्धा व भक्तीचा अभाव पदोपदी दिसून येतो.शासनाने शिक्षणाचे केलेले व्यावसायिकरण,संस्थाचालक राजकारण्यांची हुकुमशाही,क्लासवाल्यांनी धनाढय पालकांच्या मिलीभगतने केलेले स्पर्धा परिक्षांच्या गुणवत्तेचे केलेले सुप्त व्यापारीकरण उत्तरोत्तर अनिर्बंध वाढते आहे.परिणामी गुरुशिष्य परंपरेचेही अधःपतन क्षणोक्षणी होत आहे.” अशी खंत सत्कार संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी प्रतिपादीत केली.गुरुपौर्णिमेच्या औचित्याने गुणवंत शिक्षकांचा त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ व ‘ महात्मा जोतिबा फुले यांचे अमर जीवन ‘ शास्री नारो बाबाजी महाधट पाटील लिखित वाचनीय पुस्तक भेट देऊन हृद्य सत्कार करण्यात आले .
जि.प.मुलींची शाळा आव्हाणे येथील ज्ञानपिपासू शिक्षक संदीप पवार यांनी ‘ स्वातंत्र्योत्तर काळातील आदिवासी गोंड जमातीच्या सर्वांगिण वाटचालीचा ऐतिहासिक अभ्यास ‘ या विषयान्वये प्रा.डॉ.जे.व्हि.दुबे ( मुळजी जेठा महाविद्यालय,जळगाव ) यांच्या अमूल्य मार्गदशनाखाली संशोधन कार्य पूर्ण केल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यापीठ तर्फे विद्या वाचस्पती पदवी प्राप्त झाल्याच्या सन्मानार्थ देवकाई
प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील दाभाडे यांच्या हस्ते पवारांना सन्मानित करण्यात आले.
माध्यमिक विद्यालय बांभोरी ( प्र.चां. ) तालुका धरणगाव ग्रेडेड मुख्याध्यापिका श्रीमती साधना लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या ( मुंबई ) राज्यस्तरावर महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाल्या प्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तक देऊन भावपूर्ण सत्कार शारदा कॉलनीतील निवासस्थानी करण्यात आला.सत्काराप्रसंगी साधना ताई म्हणाल्या की, ‘ निवृती नंतरही शिक्षकी पेशाबद्दल संयोजकांचा आदर व गुणग्राहक प्रवृत्तीचे अप्रूप वाटून मनस्वी आनंद झाला.सुप्रसिद्ध चित्रकार सुनिल दाभाडे,साधना ताईंचे सुपूत्र स्थापत्य अभियंता सारंग लोखंडे व स्नुषा वास्तु विशारद आनल लोखंडे,आदर्श शिक्षिका मनिषा पाटील,विराट पाटील सत्कारा प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साने गुरुजी कथामालेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा पाटील मॅडम व पुस्तक भिशी सदस्या आदर्श शिक्षिका उषा सोनार यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.