• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साहित्यात कृष्णा प्रवाहित झाली तर जिज्ञासापूर्वक अभ्यासाने यशपालन सोपे जाते

Jul 24, 2024

Loading

साहित्यात कृष्णा प्रवाहित झाली तर जिज्ञासापूर्वक अभ्यासाने यशपालन सोपे जाते

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा व प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे व यशवंतांचे पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविक व सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदी निवड झालेला साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार ( क्लास १) , कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेली माजी विद्यार्थीनी जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे व अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यशपाल पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणतेही यश हे आपल्याला सहजासहजी मिळत नाही. त्यामागे अनेक समस्या अडचणी यांच्यावर मार्ग काढून यश मिळत असते. आपल्याला जे दिसते ते अर्धसत्य असते. यशस्वी माणसाच्या या यशामागे अशा अनेक गोष्टी असतात त्या जाणून घेतल्या पाहिजे व मार्गक्रमण केले पाहिजे. जिज्ञासा सागोरे हिने मनोगतात सांगितले की, माझ्या यशामागे साने गुरुजी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालकांचा व पालकांचा मोठा वाटा आहे. तर कृष्णा पाटील यांनी अहिराणीतून मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना आत्मबल वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संदीप घोरपडे म्हणाले की या बरबटलेल्या व्यवस्थेला सुधारण्यासाठी आपण साने गुरुजी शाळेचा वारसा टिकून ठेवाल व अशुद्ध झालेली यंत्रणा शुद्धतेकडे नेणार अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी तर आभार प्रदर्शन जे एस पाटील यांनी केले. यावेळी पालक ज्ञानेश्वर पवार, वाय एम नायदे, डी ए धनगर व यशवंतांचे आप्तस्वतीय व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *