जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 28 जुलैला
जळगाव प्रतिनिधी
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता
जळगांव येथील गुरू रविदास क्लब व संत रोहिदास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी/ समाज बांधवांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता केमिस्ट भवन,सिंधी कॉलनी रोड,जिल्हा पेठ,जळगांव या ठिकाणी प्रमुख अतिथी ना.गुलाबराव पाटील (पालकमंत्री,तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री,म.राज्य),खासदार सौ.स्मिताताई वाघ,आमदार श्री.राजुमामा भोळे,आमदार श्री.संजयजी सावकारे, माजी महापौर श्री.विष्णू भाऊ भंगाळे,सौ.जयश्रीताई महाजन,प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ.रजनीताई सावकारे, माजी नगरसेविका सौ.सुरेखाताई तायडे,श्री.रमेश वाघ (गटविकास अधिकारी,चोपडा ),श्री.गजाननतायडे(मुख्याधिकारी,नगर पंचायत, बोदवड),श्री.चंद्रकांत वानखेडे(वित्त व लेखा अधिकारी),श्री.राजेंद्र बावस्कर ( सेवानिवृत्त,मुख्य अभियंता ,महाजेनको तथा अध्यक्ष: जय गणेश जेष्ठ नागरिक संघ,अंधश्रध्दा निर्मुलन समिती,भुसावळ),श्री.योगेश अहिरे (उप अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग),श्री.विजय पवार (संचालक,ग. स.सोसायटी तथा शिक्षण विस्तार अधिकारी,जळगांव),सदर कार्यक्रमासाठी गूगल फॉर्म लिंक द्वारे दिनांक 15 जुलै पर्यंत गुणवंताकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी तसेच मुदतीत प्रस्ताव सादर केलेल्या गुणवंत विद्यार्थी/समाजबांधवांनी नियोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य डॉ. श्री.सुनील सूर्यवंशी, डॉ.संपतराव वानखेडे,श्री.राजेंद्र बावस्कर, श्री.यशवंतराव ठोसरे ,श्री.संजय वानखेडे,प्रा.श्री.विठ्ठलराव सावकारे,श्री.निवृत्ती सूर्यवंशी,श्री.प्रकाश रोझतकर,श्री.कैलास वाघ,श्री.विजय पवार,श्री.प्रदीप शेकोकार,श्री.दिलीप दांडगे,प्रा.श्री.गणेश सूर्यवंशी,श्री.गजानन दांडगे ,प्रा.डॉ.श्री.सुनील निंभोरे,प्रा.सौ.स्मिता जयकर,सौ.ज्योती निंभोरे,सौ. उज्वला वाडेकर,सौ.वंदना तायडे, श्री.अरुण नेटके,श्री.कमलाकर ठोसर,प्रा.रवी नेटके,श्री.पुरुषोत्तम चिमणकर,श्री.सुनील वानखेडे,श्री.प्रशांत सोनवणे,श्री.संजय भटकर,,प्रा.संदीप शेकोकार ,श्री.संजय बाविस्कर,श्री.राजेश वाडेकर आदींनी केले आहे.