• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लासूर केंद्राची शिक्षण परिषद मजरेहिंगोणे शाळेत संपन्न

Aug 2, 2024

Loading

लासूर केंद्राची शिक्षण परिषद मजरेहिंगोणे शाळेत संपन्न-लासूर केंद्राची शिक्षण परिषद

दिनांक 31 जुलै, 2024 रोजी मौजे -मजरे हिंगोणा मार्फत मजरेहिंगोणे शाळेत संपन्न झाली कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीच्या पूजनाने व ईशस्तवनाने झाली. परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख श्री उत्तम चव्हाण हे तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी श्री आर ओ वाघ तसेच गटशिक्षणाधिकारी श्री अविनाश पाटील हे उपस्थित होते. शाळेतील पदवीधर शिक्षक व ग स. संचालक यांनी शाळेत स्वच्छतागृहासाठी केलेला पाठपुरावा, वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन याबत केलेले स्तुत्य काम तसेच नाशिक विभाग मा.पदवीधर आमदार तांबे साहेबांमार्फत शाळेसाठी मिळवलेले संगणक आणि शाळेतील मुख्याध्यापक वैशाली पवार व पदवीधर शिक्षक मोनेश बाविस्कर यांचे संगणक वापर कौशल्य याबाबत समाधान व्यक्त करून मजेरे हिंगोना शाळेचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
शिक्षण परिषदेत सेतू अभ्यास विश्लेषण या विषयावर मोनेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले पायाभूत चाचणी बाबत किरण सोमवंशी यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले तर शिक्षणाच्या प्रवाहात सर्व घटकांचा समान संधी साठी वंचिताचे शिक्षण समस्या व उपाय याबत गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले
लिहिते होऊ या या विषयावर तसेच प्रशासकीय सूचना बाबत मार्गदर्शन केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण यांनी केले.गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांनी वृक्षरोपण व स्वछतागृह पाण्याची व्यवस्था या बाबत आढावा घेतला. मजरे हिंगोणा शाळेने राबवलेले सहशालेय उपक्रम तसेच वृक्षरोपण बाबत मजरेहिंगोने शाळेचे विशेष अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी श्री अविनाश पाटील यांनी पायाभूत चाचणी, निपून चाचणी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करून भाषा गणित मूलभूत संकल्पना संबोध सर्व विद्यार्थ्यांना आले पाहिजेत याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच शाळेची यशोगाथा वैशाली पवार यांनी मांडली. प्रास्ताविक श्री.मोनेश बाविस्कर यांनी तर आभार योगेश सनेर यांनी मानले. यावेळी केंद्रातील ग्रेडेड मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक,सर्व शिक्षक बंधू भगिनी हे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रमोद देवरे,मनीषा पाटील, धनराज बोरसे व दिपाली धनगर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती योगदान यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed